Bank Holidays January 2025: भारत देशात वर्षभर विविध सण समारंभ मोठ्या उत्सहाने साजरे करण्याची परंपरा आहे. वर्षभरात त्या त्या महिन्याला सणानिमित्ताने बँकांना देखील सुटी असते. यानुसार वर्षाचा पहिल्या महिन्यात देखील बँकांना सुट्या आल्या आहेत.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिद्वारा बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात येते. यानुसार, जानेवारी महिन्यात शनिवार, रविवारच्या सुट्या मिळून ११ दिवस बँक बंद असणार असणार आहे. जानेवारी महिन्यात स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांती आदी सुट्या आहेत. या दिवशी बँका बंद असतील.
1 जानेवारी 2025 – नवीन वर्षाचा दिवस (संपूर्ण भारतात बँका बंद राहतील)
6 जानेवारी 2025 – गुरु गोविंद सिंग जयंत
12 जानेवारी 2025 – स्वामी विवेकानंद जयंत
14 जानेवारी 2025 – मकर संक्रांती / पोंगल
14 जानेवारी 2025 – मोहम्मद हजरत अली / लुई-नगाई-नी यांचा वाढदिवस
26 जानेवारी 2025 – प्रजासत्ताक दिन
जानेवारीमध्ये, 4 रविवारी म्हणजे 5, 12, 19, 26 रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील.
11 आणि 25 जानेवारोला बँकांना सुट्टी असेल, म्हणजेच शनिवार हा दुसरा आणि चौथा शनिवार आहे.
बँक बंद असल्यामुळे प्रभावित होणारे कार्य:
बँक बंद असतानाही तुम्ही ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि UPI सारख्या डिजिटल सेवा वापरून आपले महत्त्वाचे बँकिंग कार्ये पूर्ण करू शकता.
एटीएम किंवा नेट बँकिंग द्वारे पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे अशा सेवा 24/7 उपलब्ध राहतील. या सेवांचा वापर करा. यामुळे तुम्ही तुमचे महत्त्वाचे बँकेशी संबंधित काम पूर्ण करणे सोपे करू शकता.
त्यामुळे, बँक बंद असतानाही तुम्हाला आपल्या आर्थिक कामकाजासाठी डिजिटल उपायांचा उपयोग करून समस्या टाळता येईल. व्यवस्थित नियोजित करता येईल.