---Advertisement---

JDCC Bank : आतापर्यंत १८ हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटींचे कर्ज वाटप, २०२४-२५ साठी एक हजार कोटींहून अधिक पीककर्जाचे वितरण : संजय पवार

---Advertisement---

JDCC Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्ह्यात मार्च २०२४-२५ अंतर्गत सुमारे पावणेदोन लाख शेतकयांना एक हजार १६ कोटींचे पीककर्ज वितरण करण्यात आले होते. त्यात एक लाख ३५ हजार शेतकयांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी ९२५ कोटी म्हणजेच सरासरी ९१ टक्के पीककर्ज रकमेचा भरणा केला आहे. त्यानुसार नव्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत एप्रिलच्या चौथ्या सप्ताहाअखेर १८ हजार १३४ शेतकऱ्यांना १४९ कोटी ८० लाखांच्या पीककर्जाचे वितरण झाले आहे. या खरीप हंगामासाठी सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचे पीककर्जाचे वितरण होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामीण स्तरावर ८७७विकास कार्यकारी सोसायट्या आहेत. त्यांच्यामार्फत जिल्हा बँकेतर्फे दरवर्षी शेतकयांना पीककर्ज पुरवठा केला. जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सुमारे ५५० व्या वर विकास सोसायट्या अनिष्ट तफावतीत आहेत. यामुळे या विकास संस्थांचे ३०० कोटींचे कर्ज निर्ले खित केले आहे. २०२४ पासून काही ठिकाणी या विकास सोसायट्यांऐवजी जिल्हा बँकेच्या शाखांमार्फत सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना २४५ कोटींचा थेट पीककर्ज पुरवठा केला होता. त्यानुसार यावर्षी ३१ मार्च २०२५ पर्यंत जिल्हा बँकेकडे एक लाख ३५ हजार पीक कर्जदार शेतकयांनी ९२५ कोटी अर्थात सुमारे ९९ टक्के रकमेचा भरणा जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये केला आहे.

ज्या शेतकयांनी कर्ज घेतलेले असते. ते ३१ मार्चच्या आत भरावे यासाठी त्यांची पैशासाठी वणवण होते. एप्रितमध्ये परत त्यांना कर्ज दिले जाते. थोड्याच दिवसांसाठी शेतकरी बाहेरून पैसे उचल करतात. पुन्हा तीच कागदपत्रे नव्याने द्यावी लागतात. शेतकऱ्यांची ही दगदग कमी करण्यासाठी दरवर्षी शेतकयांना मुद्दल भरावे लागू नये, फक्त व्याज भरावे, कर्जाचे नूतनीकरण करून द्यावे, असे धोरण लागू व्हावे यासाठी संजय पवार यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री व सहकार मंत्र्यांकडे गुरुवारी (२४ एप्रिल) पत्रव्यवहार केला असल्याचेही जिल्हा
बँक प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हा बँकेअंतर्गत सद्यःस्थितीत पीककर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंतची आहे. या कर्जासाठी कागदपत्रे जमविणे व अन्य आर्थिक खर्च तसेच महागाईचा विचार करता पीककर्जाची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी. तसेच जाचक अटीतून सुटका मिळावी, अशीही मागणी या पत्रात करण्यात आली असत्याचे जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले आहे.

मार्चअखेर पीककर्ज वसुली ९१ टक्क्यांपर्यंत

खरीप हंगामासाठी स्थानिक विकास सोसायट्यांसह जिल्हा बँकेच्या विविध शाखांतर्गत ३० जूनपर्यंत पीककर्जाचे वितरण सुरू असते. २०२४-२५ अंतर्गत मार्चअखेर पीककर्जाची वसुलीही सुमारे ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी पीककर्ज परतफेड केली आहे. त्यांना पीककर्जावर शून्य टक्के व्याजदराचा फायदा मिळाला आहे. अशा वेळेत पीककर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यंदा ३५४ कोटींवर पीककर्ज वाटप

जिल्हा बँकेतर्फे नवीन आर्थिक वर्षात १ ते २५ एप्रिलदरम्यान सुमारे ४२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ३५४ कोटी २३ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे. यात स्थानिक स्तरावरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत ३६ हजार ५५२ शेतकऱ्यांना २७० कोटी १८ लाख, तर जिल्हा बँकेच्या विविध शाखांमार्फत थेट ५ हजार ८२९ शेतकऱ्यांना ४४ कोटी ५ लाखांचे कर्ज रकमेचे वितरण करण्यात आले आहे. २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत सर्वाधिक पारोळा तालुक्यात १ हजार ३८३ शेतकऱ्यांना, तर त्याखालोखाल बोदवड तालुक्यातील १ हजार ३५७ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण झाले आहे. तसेच भडगाव तालुक्यात सर्वांत कमी ५ शेतकऱ्यांनी तर रावेर तालुक्यातून ८ शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत पीककर्जाची उचल केली

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment