Crime News : फक्त स्वीफ्ट डिझायनर लांबविणारा सराईत संभाजीनगरातून जेरबंद

जळगाव : वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासातून एमआयडीसी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराबाला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची कार पथकाने जप्त केली. शेख दाऊद शेख मंजुर (रा. सुंदरवाडी संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. फक्त स्वीफ्ट डिझायनर याच गाडीची चोरी करण्यासाठी तो माहीर आहे. त्याच्यावर राज्यात विविध जिल्ह्यात कार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दीपक जगदीश खडके यांची क्र. एमएच ०२ सीडब्लू ०९०६ ही कार शहरातील सद्‌गुरुनगर येथील घरासमोरुन चोरी झाली होती.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोका राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे, यांनी तांत्रीक पद्धतीने तपास करुन सदर कार ही संभाजीनगरच्या दिशेने गेल्याचे दिसुन आल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन वेगवेगळी पथके संभाजीनगरच्या दिशेने रवाना केली. दाऊद याच्यावर राज्यासह भारतात अनेक शहरामध्ये कार चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गोपनीय माहितीवरुन शेख दाऊद याला संभाजीनगरातील सुंदरवाडी येथील त्याच्या राहत्या घरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे एक स्वीफ्ट डीझायर कार क्र. एमएच १५ जी ए ४८८७ ही मिळून आली. ही कार परभणी येथुन चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

या कारसंदर्भात नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती पथकाला मिळाली. संशयिताने दिपक जगदीश खडके यांच्या मालकीच्या कार चोरीची काहीही माहिती दिली नाही. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका दत्तात्रय बडगुजर, पोना किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पौका. राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा तपास पोहेका दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

गेल्या वर्षापासून तिघे बेपत्ता मिळाले

जळगाव : सन २०२३ पासून तीन इसम बोदवड येथुन बेपत्ता झाले होते. हे तिघे जण गुरुवार, १७ रोजी मिळून आले. पोलिसांनी तिघांना कुटुंबियांच्या ताब्यात दिले. २७ वर्षीय तरुण ३१ मे २०२३ रोजी बेपत्ता झाला होता. ४५ वर्षीय इसम ७ मे २०२३ रोजी तर २१ वर्षीय तरुण २५ जून रोजी बेपत्ता झाला होता. या तिघांची मिसिंग बोदवड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तिघांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले