Hindustan Copper HCL Recruitment 2025: तुम्ही केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची संधी शोधत आहात का ? तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये तुमच्यासाठी जागा रिक्त आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये काही पदांसाठी भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या पदांवर निवडीकरीत कोणतीही लेखी परीक्षा असणार नाही, तर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. तुम्हाला या भरती संदर्भांत तपशील जाणून घ्यायचं असेल तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, hindustancopper.com.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 96 पेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन A आणि B च्या 36-36 पदांसह चार्जमन इलेक्ट्रिकलच्या 23 पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी मागितलेल्या पात्रतेनुसार, उमेदवाराकडे 20 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. जोपर्यंत वयोमर्यादेचा संबंध आहे, उमेदवाराचे कमाल वय 63 वर्षे असणे आवश्यक आहे.
निवड मुलाखतीवर आधारित असेल
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. 16 जानेवारी रोजी मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीसाठी उमेदवारांना कॉन्फरन्स हॉल, ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड खेत्री नगर, राजस्थान या पत्त्यावर पोहोचावे लागेल. त्यामुळे तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर मुलाखतीची तयारी करा. अंतिम निवडीनंतर, उमेदवारांना दरमहा 28152-31280 रुपये वेतन मिळेल.