सहाव्या टाटा एआयजी खान्देश रन २०२२ मध्ये धावणार३००० हजार धावपटू

जळगाव – जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित सहाव्या टाटा एआयजी खान्देश रन २०२२ मध्ये आज देशभरातील ३००० पेक्षा अधीक रनर्स धावणार आहेत.चार विविध गटात ही खान्देशस्तरीय मॅरेथॉन संपन्न होणार आहे.सकाळी ५.३० वाजेला सागर पार्क येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.२१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन,१० किलोमीटर टाईम रन, ५ किलोमीटर स्टॅमिना रन आणि ३ किलोमीटर फन रन अश्या चार गटात ही स्पर्धा पार पडणार आहे.सागर पार्क येथून सुरुवात झाल्यानंतर काव्यरत्नावली चौक, डीमार्ट, मोहाडी रोड मार्गे लांडोरखोरी, उद्यान -रायसोनी नगरपर्यंत तेथून परत यू – टर्न घेऊन पुन्हा त्याच मार्गाने सागर पार्कवर येऊन संपन्न होणार आहे.

एक्सपोचे उदघाटन उत्साहात संपन्न

जे.आर.जी खान्देश रन २२०२ च्या एक्सपोचे उदघाटन आज दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील खान्देश सेंट्रल मॉल येथे जळगाव मनपा. महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, गोदावरी फाऊंडेशनचे डॉ. वैभव पाटील, हॉटेल प्रेसिडेंटचे सौरभ आडवाणी यांचा शुभहस्ते एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले.या एक्सपोमध्ये सर्व रजिस्टर्ड रनर्सला खान्देश रनची संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी रनसाठी बनविलेल्या ड्रायफीट टी-शर्ट, बिब नंबर व गुडी बॅग प्रदान करण्यात आले. यावेळी रन साठी रजिस्टर्ड ३००० पेक्षा अधिक रनर्सची उपस्थिती होती. या वेळी रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव, विक्रांत सराफ, निलेश भांडारकर, डॉ.रवि हिरानी, ज्ञानेश्वर बढे,डॉ.विवेक पाटील डॉ. प्रशांत देशमुख व इतर सदस्य उपस्थित होते.

एक्स्पो स्थळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल खान्देश रन २०२२च्या एक्सपोचे उदघाटनवेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश वंदना प्रभाकर कला संगीत एकेडेमी, रिदमीक योगा बाय सोहम योग डिपार्टमेंट (मुलजी जेठा कॉलेज),लोकेश व सागर यांनी खान्देश रन च्या शीर्षक गीतावर नृत्य सादर केले. या सर्वांनी आपल्या आपल्या कलेचे सादरीकरण केले.

मुंबईतुन आलेल्या झिफर क्लब (हार्ट ची बायपास सर्जेरी )झालेल्याचे २० रनर्स सदस्य सुध्दा उपस्थित होते.या वेळी डॉ.सोनाली महाजन उपस्थितांना सी.पी.आर बद्दल टिप्स देण्यात आल्या.या रनिंग सोहळा निम्मित्ताने आलेल्या निरोगी मन-निरोगी शरीर चा संदेश खान्देशातील सर्व समाजाचा अधिकाधिक लोकां पर्यंत आपल्या दैनिकाचा माध्यमातून पोहचावा ही अपेक्षा.