दीव : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांचे पहिले ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. १९ मे रोजी सुरू झालेल्या या खेळांचा समारोप शनिवारी झाला. हा समारोप समारंभ दीव येथील आयएनएस खुकरी स्मारक येथे पार पडला. यावेळी क्रीडा आणि युवा व्यवहार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
“दीव नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल मी केंद्रशासित प्रदेशाचे मनापासून अभिनंदन करते. भारतातील बीच गेम्ससाठी दीव हे हॉटस्पॉट म्हणून पाहणे हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे आणि मला वाटते की आयोजकांनी खेळाडूंना आवश्यक असलेल्या उत्तम सुविधा आणि लक्ष देऊन त्यांना पाठिंबा देण्याच्या बाबतीत खरोखर चांगले काम केले आहे.” असल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत ८११ खेळाडूंनी सहा पदक खेळांमध्ये भाग घेतला – पेनकॅक सिलाट, सेपक-टकराव, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खुल्या समुद्रात पोहणे आणि कबड्डी, मल्लखांब, रगडाओर हे पदक नसलेले प्रात्यक्षिक खेळ होते.
खेलो इंडिया मिशनच्या उद्दिष्टांचा पुनरुच्चार करताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या: “खेलो इंडिया उपक्रमाची संकल्पना देशभरातील तळागाळातील क्रीडा संस्कृती मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. खेलो इंडिया बीच गेम्स हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी अनेक रोमांचक आणि कमी ज्ञात बीच आणि जलक्रीडांकडे लक्ष वेधले आहे.”