---Advertisement---

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवीचा संघ जाहीर, कर्णधारपदाबाबत घेतला हा निर्णय

by team
---Advertisement---

Champions Trophy :न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघांची घोषणा केली आहे. हा संघ फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यात १५ खेळाडूंचा समावेश आहे. या ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा संघ भारत, बांग्लादेश आणि पाकिस्तान या गटात आहे. न्यूझीलंडची धुरा केन विल्यमसनऐवजी सँटरनच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळेच त्याच्यावर विश्वास दाखवलाय. आयसीसी स्पर्धेत मिचेल सँटर पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ गट-अ मध्ये आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडने युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले कॉम्बिनेशन ठेवलेय. संघात विल्यम ओ’रोर्क, नॅथन स्मिथ आणि बेन सीयर्स यांना स्थान दिलेय. हे तिन्ही गोलंदाज पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत खेळणार आहेत. बेन सियर्सबद्दल गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव खेळाडू होता. आता त्याला मुख्य संघात स्थान मिळालेय.

लॅथम यष्टीरक्षकाची भूमिकाही बजावेल. फलंदाजीत मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन, यांचा पर्याय आहे. न्यूझीलंडचा संघ 19 फेब्रुवारी रोजी सामना खेळेल, तर 24 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळेल. 2 मार्च रोजी न्यूझीलंड आणि भारताचा सामना होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ :
रोहित शर्मा,  विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर,   हार्दिक पंड्या, रिषभ पंत, नितेश रेड्डी रविंद्र जडेजा, अक्षर पटेल/ वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव/ रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment