लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालणार ; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांना चपराक

Devendra Fadnavis on Raj Thackeray: मुंबईतील गोरगाव येथे राज ठाकरे यांचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
पुढचा एक महिना सरकारकडून या योजनेचे पैसे मिळतील, त्यानंतर पैसे मिळणार नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकटं वीज ते फक्त विजेत सातत्य मागत आहे. असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशांवरून आज मेळाव्यामध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलं आहे.

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
लाडकी बहीण योजना ही पाच वर्षांपर्यंत चालणार आहे आणि या योजनेसाठी लागणारा निधी सरकारने तयार करून ठेवला आहे. त्यामुळे विरोधक काही बोलत असले, तरी मात्र ही योजना निरंतर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अनेक लोक वल्गना करत आहे, चुकीचं सांगत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे सर्व पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. ही लाडकी बहीण योजना आताही चालणार आहे, पुढेही चालणार आहे, आणि पुढचे पाचही वर्ष टिकणार आहे, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.