तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये मुलींच्या समीकरण या करीता लेक लाडकी ही नवी घोषणा जाहीर केली आहे. चला तर काय आहे लेक लाडकी योजना जाणून घेऊयात तरुण भारतच्या माध्यमातून.
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मला आल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये. अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये