सोयगाव : बसस्थानक आणि बस आगारात एस.टी.चा ७७ वा वर्धापन दिन केक कापून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सोयगाव बसस्थानक रांगोळी, फुलांच्या माळांनी सजवलेले बसस्थानक,व पताका लावून साजविण्यात आले होते.
लालपरीचा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव बसस्थानकावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख मनीष जवळीकर, सोयगाव शहरातील रहिवासी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख मोती जोहरे उपस्थित होते. यावेळी आगारप्रमुख मनिष जवळीकर यांनी एस. टी. महामंडळ देत असलेल्या समाजिक सवलतींचा लाभ जास्तीत जास्त प्रवश्यानी घेऊन एसटीने प्रवास करण्याचे आवाहन वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रवाशी यांना केले केले.

केंद्रप्रमुख मोती जोहरे यांनी एसटी बद्दल आपले मनोगत व्यक्त करून एस.टी.संबंधित जुन्या आठवनींना उजाळा दिला. बसस्थानकावर फुलांनी सजविलेल्या एस.टी.सोबत केक कापून आणि प्रवाशांना पेढे वाटून आणि पुष्पगुच्छ देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ प्रवासी दगडू आस्वार, रंगनाथ देहाडराय, विजय जोशी, योगेश बोखारे पाटील, सरोदे बाबा, वाहतूक निरीक्षक सतिश अंभोरे, लिपिक सतिश पाटील, शेख नसीम, समाधान जाधव, जयराम सूर्यवंशी, ज्ञानेश्वर वाडेकर, मधू शिंदे, माणिक मुरमुरे, दिनकर लवटे, गौतम बनसोडे, जोहेब तडवी, अशोक तायडे,यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवासी,चालक आणि वाहक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश पाटील आणि समाधान जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पगारे, नाना शेरे आणि सतिश नेरपगारे यांनी परिश्रम घेतले.