जळगाव : स्वामिनी फाउंडेशन संचलित लेवा सखी घे भरारी तर्फे महिलांसाठी चालणे, धावणे, सायकलिंग व दोरी उड्या अश्या विविध स्पर्धां रविवार दि. 8 रोजी खान्देश सेंट्रल येथे घेण्यात आल्या. यात 18 वर्षाच्या तरुणीपासून ते 76 वर्ष वयाच्या आजीपर्यंत अश्या एकूण 250 महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रमुख पाहुण्या गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. वर्षा पाटील व अध्यक्ष स्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे या होत्या. यावेळी स्वामिनी फाऊंडेशनच्या ज्येष्ठ महिला व योग शिक्षिका मीरा चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रशेखर झोपे आणि निता वराडे यांनी शंख नाद केला. तर डॉ. वर्षा पाटील, आणि मीरा चौधरी यांनी धावण्याच्या स्पर्धेला, चालण्याच्या स्पर्धेला उडान दिव्यांग केंद्राच्या विद्यार्थ्यानी तर सायकल चालविण्याच्या स्पर्धेला उषा राणे व Cyclist SR कामिनी धांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. तसेच दोरी उड्या ची स्पर्धा लीना नेमाडे व पूजा महाजन, जस्मिन गाजरे यांनी घेतली.
सर्व सहभागी स्पर्धकांचा सौरव
Cyclist SR कामिनी धांडे यांनी नुकतेच नाशिक ते स्टॅच्यु ऑफ युनिटी हा प्रवास सायकल वर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना स्वामिनी फाउंडेशन तर्फे जिल्हा क्रिडा अधिकारी सुजाता गुल्हाणे मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
डॉ. वर्षा पाटील यांनी रोज सकाळी चालणे, फिरणे, धावणे, सायकलींग किंवा कोणताही व्यायाम करणे कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. तर मीराताई चौधरी यांनी ही महिलांसाठी योगा, प्राणायाम व व्यायामाचे महत्व सांगितले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांनी ही खेळ हे निरोगी जीवनाचे गमक आहे हे सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.
स्वामिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. भारती ढाके यांनी या स्पर्धांच्या आयोजनाचे उद्दिष्ट सांगताना महिला परिवारातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक गंभीर आजारांना कसे सामोरे जावे लागते या बद्दल सांगितले. या स्पर्धांच्या निमित्ताने महिला आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम समावेश करतील या दृष्टिने अश्या स्पर्धांचे आयोजन स्वामिनी फाउंडेशन दरवर्षी जानेवारी महिन्यात करत असते.
स्पर्धेतील सहभागी महिलांचे डॉ. सई नेमाडे यांनी हिमग्लोबीन तपासणी साठी सहकार्य केले. या स्पर्धांचे आयोजन प्रमुख डॉ. भावना चौधरी, कामिनी धांडे, चित्रा महाजन या होत्या. यावेळी सपना तिवारी यांनी झुंबा घेतला. स्पर्धांचे परीक्षण डॉ.सुनिता चौधरी, डॉ. कल्पना भारंबे व कांचन राणे, सूत्रसंचालन मनिषा चौधरी व आभार प्रदर्शन सविता भोळे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा ॲड. भारती ढाके, डॉ. निलम किनगे, डॉ. स्मिता पाटील, भारती चौधरी, सोनाली पाटील, कांचन राणे, वनिता चौधरी, उषा राणे, संगीता पाटील, सविता भोळे, संगीता रोटे, लीना नेमाडे, नेहा झोपे, पूजा महाजन, कविता चौधरी, रश्मी झांबरे, सीमा गाजरे यांनी परिश्रम घेतले. विद्या झोपे व चंद्रशेखर झोपे यांचे अनमोल सहकार्य लाभले.