पॅरिस, जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीला कारचीही खूप आवड आहे. आतापर्यंत लिओनेल मेस्सी पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळत होता. आजपासून तो डेव्हिड बेकहॅमचा क्लब मियामी CF सह प्रवास सुरू करणार आहे.
नुकताच मेस्सी आपल्या कुटुंबासोबत खरेदीसाठी मियामी सिटीला गेला होता. येथे तो त्याच्या Audi Q8 मधून थोडक्यात बचावला सगळी कडेच अपघात होत असताना आता मेस्सीचा सुद्धा समोर आले आहे. त्यात मेस्सीने लाल दिवा ओलांडून अपघात टळल्याचे म्हटले आहे.पांढऱ्या रंगाच्या ऑडी Q7 मध्ये लिओनेल मेस्सी उपस्थित होता की नाही याची पुष्टी झालेली नाही. कार अपघातातून बचावल्यानंतर फ्लोरिडा पोलिसांनी ही कार घरापर्यंत पोहोचवली. Messi ऑडी Q8 ने ट्रॅफिक सिग्नल तोडून मुख्य रस्त्यावर डावे वळण घेतल्याचे व्हिडिओमध्ये समोर आले आहे. या रस्त्यावर भरधाव वेगाने कार येत होत्या, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. आलिशान कार कलेक्शन असलेल्या लिओनेल मेस्सीकडे ऑडी Q8 SUV आहे.