कोल्हापूर : येथे लग्नास नकार देणाऱ्या लिव्ह इन रिलेशशिपमधील तरुणीचा तिच्याच प्रियकराने धारदार शास्त्राने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर तिचा प्रियकर फरार झाला आहे. खून झाला त्यावेळी तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत खरेदीसाठी आलेली होती. समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी (वय 23, रा. जयभवानी गल्ली) असं खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या प्रियकराचे नाव सतीश यादव आहे.
समीक्षा ही आपल्या आई आणि लहान बहिणी भावासोबत कोल्हापूर कसबा बावडा येथील जय भवानी गल्लीत वास्तव्याला होती. तिचे २०१८ साली लग्न झाले होते. परंतु, लग्नाच्या तीन महिन्यानंतरच पतीशी पटत नसल्याने नवऱ्याला सोडून दिले होते. यानंतर ती जय भवानी गल्लीत राहायला गेली होती. तिच्या घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. तिची आणि मासे विकून उदरनिर्वाह करायची. तसेच समीक्षा ही इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करुन आईला हातभार लावत होती.

या कामाच्या निमित्ताने तिची ओळख ओळख कोल्हापुरात कामानिम्मित आलेली तेलंगणा इथली तरुणी आयशू आंपले आणि कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहणारा संशयित सतीश यादव यांच्याशी झाली. यानंतर सतीश व समीक्षा हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. या दोघांसोबत त्यांची मैत्रीण आयशू देखील राहत होती. परंतु. मागील महिन्यांपासून समीक्षा व सतीश यांच्या सतत वाद होऊन भांडण होत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून आठ दिवसापूर्वीच समीक्षा आपल्या आईकडे मैत्रीण आयशू सोबत राहायला गेली होती. यादरम्यान सतीश समीक्षाला वारंवार फोन करुन त्याची भेट घेण्याचा आग्रह करीत होता.
समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघी आपलं सामान आणण्यासाठी मंगळवारी दुपारी फ्लॅटवर गेल्या. यावेळी साहित्य आवरत असताना समीक्षाने सतीशला फोन केला. फ्लॅटवर 15 मिनिटांनी सतीश देखील आला. सतीशने पुन्हा लग्नासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वाद वाढत जाऊन सतीशने अत्यंत निर्घृण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने वार केले. छातीत खोलवर वाद झाल्याने समीक्षा जाग्यावर कोसळी. यानंतर सतीश घटनास्थळावरुन फरार झाला. . रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला मैत्रीणीने मित्राच्या मदतीने पहिल्यांदा खासगी रुग्णालयानंतर सीपीआरमध्ये उपचाचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता