---Advertisement---

Nandurbar Crime : अवैध मद्य वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;लाखांचा मुद्देमाल जप्त

by team
---Advertisement---

नंदुरबार :  अक्कलकुवा हद्दीत वाण्याविहीर गावाजवळ तळोदा अक्कलकुवा रोड लगत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आली आहे. यात  एकुण 10 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहादा येथून खापरकडे एक मालवाहू अॅपे रिक्षा वाहनामध्ये विदेशी दारूची अवैध वाहतुक होणार आहे, अशी खात्रीशीर माहिती होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे अक्कलकुवा हद्दीत वाण्याविहीर गावाजवळ तळोदा अक्कलकुवा रोड लगत येऊन थांबले असता, काही वेळाने मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे तळोदा कडून एक तीन चाकी वाहन (अॅपे रिक्षा क्रमांक MH 15 CK 1539) येतांना दिसले, त्यास थांबविण्यात आले. सदर वाहनाची तपासणी करता त्यामध्ये खाकी रंगाचे खोके दिसुन आले.ज्यात अवैध मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या बाबत चालक अमर फुलसिंग वळवी (वय- 40 वर्षे, रा. आमलीफळी) यास मालाची परवानगी आहे काय बाबत विचारणा करता त्याने कुठल्याही प्रकारची परवानगी नसलेबाबत कळविले तसेच सदरचा माल हा विक्की रविंद्र शिंदे, रा. खापर ता. अक्कलकुवा यास विक्री करण्यासाठी गाडी मालकाचे सांगण्यावरुन घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.

या कारवाईत कारवाईत एकुण 10 लाख 62 हजार रुपये किमतीचा देशी/विदेशी दारु तसेच वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून आरोपींविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 126/2025 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कामगिरी पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोहेकॉ दादाभाई मासुळ, महेंद्र नगराळे, पोना/मोहन ढमढेरे, पोकॉ/दिपक न्हावी अशांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment