---Advertisement---
स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभआहे, कारण त्यांचा दररोज जनतेशी थेट संबंध येत असतो, असे प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केले. लोकसभा तसेच हरयाणा विधानसभा यांच्या संयुक्त वतीने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हरयाणातील गुरुग्रामनजीकच्या मानेसर येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयकॅट) येथे आयोजित पहिल्या द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना बिर्ला बोलत होते.
यावेळी हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, विधानसभेचे अध्यक्ष हरविंद्र कल्याण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे हे व्यासपीठ लोकशाही मजबूत करणारे आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले. ते साकारण्यात स्थानिक स्वराज्य संस्थाना मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे.
सभागृहातील संवाद, सहमती आणि समाधान हे लोकशाही मूल्यांना जिवंत ठेवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सभागृहाच्या कामकाजात हाच आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे, असे आवाहन बिर्ला यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सभागृहातील कामकाजात शून्य तास तसेच प्रश्नोत्तराचा तास सुरू केला पाहिजे.
प्रत्येक समस्येवर सभागृहात मोकळी चर्चा झाली पाहिजे आणि जबाबदारीही निश्चित करता आली पाहिजे, असे बिर्ला म्हणाले. संसदेच्या कामकाजातील गतिरोध ज्याप्रमाणे कमी झाला, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजातील गोंधळ आणि गदारोळ कमी झाला पाहिजे. त्या सभागृहांचे कामकाजही सुरळीत