---Advertisement---
अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लोकसभेतील खासदारांच्या हजेरीची नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासदार फक्त त्यांच्या नियुक्त जागेवर बसूनच त्यांची हजेरी नोंदवू शकतील, आणि लॉबी मधून किंवा बाहेर जाऊन हजेरी नोंदवण्याची यापूर्वीची सूट आता रद्द करण्यात आलेली आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लखनऊ मध्ये या नवीन हजेरी प्रणाली संदर्भात घोषणा केलेली आहे सध्या लखनऊमध्ये 86 व्या अखिल भारतीय पिठासन अधिकाऱ्यांच्या परिषदेत ते सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की खासदारांसाठी गांभीर्य आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्यात शिस्त निर्माण करण्यासाठी हा नवीन हजेरी प्रणालीचा निर्णय घेतला आहे.
यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला नेमकं काय म्हणाले….
संसद भवनात विरोधी पक्षांच्या खासदाराकडून एखादी मुद्द्यांवर गोंधळ घालत दिवसभरात कामकाजात अडथळा निर्माण करणे हे सामान्य आहे आणि अशा परिस्थितीत खासदार आता त्यांची उपस्थिती नोंदवू शकणार नाही जर सहभागृहाचे अधिवेशन सुरू असेल तर ते त्यांच्या जागीच बसून हजेरी नोंदवतील आणि एखाद्या वेळेस जर सभागृह तहकूब झाले तर उपस्थिती अर्थात हजेरी नोंदवण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही. येत्या 28 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहे. यासह केवळ संसद भवनात उपस्थित तिचा हा पुरावा नसावा ती संसदेत सक्रिय सहभाग दाखवण्याची मोहीम असावी म्हणून खासदार लोकसभेच्या प्रत्येक जागेवर आधीच बसवलेल्या डिजिटल कन्सोलद्वारे त्यांची हजेरी नोंदवू शकतात.









