---Advertisement---

लव्ह जिहाद : मुन्नावरुन आकाश झाला अन् हिंदू तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, मग…

---Advertisement---

बरेली : देशभरात दिवसांगणिक गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ होण्याचे प्रकार घडत आहेत. यात आत्महत्या, अनैतिक संबधातून खून, अत्याचाराच्या घटनांचा समावेश आहे. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार म्हणजे लव्ह जिहादचा आहे. याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारात एका दलित हिंदू तरुणीला दुसऱ्या धर्मीय तरुणाने नाव बदलून फसवले. त्याने आपले नाव आकाश असल्याची बतावणी करीत त्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिच्याशी शारिरीक संबंधही ठेवले. यानंतर ही तरुणी गर्भवती झाल्यावर तिचा गर्भपात केला. तसेच जेव्हा तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने तिच्याशी लग्नही केले.

लग्नाच्या काही दिवसानंतर तरुणी पुन्हा गर्भवती झाली . यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर तरुण तिने धर्मांतरण करावे असा तिच्या मागे ससेमिरा लावला. तो एकढ्यावरच न थांबता तिला नमाज पढायची सक्ती करु लागला तसेच तिच्यावर गोमांस खाण्यासाठी दबाव टाकू लागला. परंतु, जेव्हा या तरुणीने या सर्व गोष्टींना नकार दिला तर आरोपीने मुलासह तुला मारुन टाकेन असे धमकावले. यानंतर युवतीने बरेली येथील एसएसपी यांना तक्रार केली आहे.

---Advertisement---


मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी बरेली जिल्ह्याच्या बिथरी चैनपुर परिसराच्या रामगंगा नगर येथील रहिवाशी आहे. या तरुणीने म्हटले आहे की, ती दलित असून मागील 2 वर्षांपूर्वी तिची घोटिया येथील एका तरुणाशी ओळख झाली होती. त्याने आपले नाव आकाश असल्याचे सांगत माझ्यासोबत मैत्री केली होती. यानंतर मैत्रीच्या 8 महिन्यांनी त्याने तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यावेळी तिचे वय 17 वर्ष होते. यादरम्यान, त्याने तिच्यासोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवले. यामुळे ती गर्भवती झाली. ही बाब त्याला माहिती झाल्यावर त्याने तिचा गर्भपात करत तिची फसवणूक करुन तिच्याशी लग्न केले आहे.

लग्नानंतर त्याने आपल्या पत्नीचे शोषण करीत तिला मारहाण देखील केली. यादरम्यान, तिने एका मुलाला जन्म दिला. पण तिला तो पुजा करण्यापासून तिला थांबिवित होता. तिच्या पूजेत अडथळे आणत होता. तिने नमाज पठण करावे याकरिता तिच्यावर दबाव टाकत होता. इतकेच नव्हे तर गाईचे मांसही त्याने घरात अनेकदा आणले आणि तिला बळजबरीने खायला सांगितले. मात्र, तिने या सर्व बाबींना नकार दिल्यावर तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडितेने सर्वात आधी स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. मात्र, अनेकदा सांगूनही काहीच कारवाई केली नाही. यानंतर पीडित तरुणीने रायबरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्याकडे न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---