माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याला उदगीरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन अत्याचार व तिच्या मृत्यूस कारणेभूत ठरल्या प्रकरणी हि शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विकास जाधव याने 2019 मध्ये हळी (उदगीर) येथील एक 15 वर्षीय मुलीला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. मुलीच्या घरच्यांना हे समजल्यानंतर त्यांना जाधव याने जीव मारण्याची धमकी दिली होती. मुलीच्या कुटुंबीयांना तिच्या विवाहाची भीती होती, म्हणून त्यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र, विकास जाधवच्या जाचामुळे आणि तिच्यावर होणाऱ्या मानसिक व शारीरिक अत्याचारामुळे, अल्पवयीन अखेर 2020 मध्ये आत्महत्या केली.
पोलिसांकडून कारवाई
मुलीच्या आत्महत्येचा तपास सुरु झाल्यानंतर पोलिसांनी विकास जाधवविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत 376 (लैंगिक अत्याचार), 506 (धमकी देणे), 366 (अपहरण) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गु्न्हा नोंदवल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. मात्र काही दिवसांत विकास जाधव जामिनावर सुटून बाहेर आला. मयत मुलीच्या वडिलांनी प्रकरण कोर्टात नेलं आणि त्याचा पाठपुरावा केला. 21 ऑक्टोबर 2020 रोजी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यानंतर 2022 साली आरोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी, पोलीस, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पंच अशा एकूण 13 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली..
हेही वाचा : मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ
न्यायालयाचे निर्णय
सोमवारी उदगीरच्या विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी विकास जाधवला दोषी ठरवले. त्याला 10वर्षांचा सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंड ठोठवण्यात आला. दंड न भरल्यास त्याला आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल. त्याचबरोबर धमकी प्रकरणातही आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे.