फैजपूर : समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र ही शिवछत्रपतींची भूमी आहे. स्वधर्म, सुशासन आणि सामाजिक सौहार्द ही शिवछत्रपतींनी आपणा सर्वांना शिकवलेली सार्वकालिक सामाजिक मूत्ये आहेत. काही अराजकवादी प्रवृत्ती सुशासनाच्या प्रयत्नांनाही सुरुंग लावीत आहेत. ‘सजग रहो’ अभियानात सहभागी झालेल्या नामवंत मंडळींनी राज्यातील अठरापगड जातींच्या लोकांना सजग राहण्याचे आवाहन करावे, असेही ते म्हणाले.
सामाजिक वातावरण कलूषित करण्याचे प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यात आरंभ करण्यात आलेल्या सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे निंदनीय प्रयत्न समाजातील विविध घटकांकडून सातत्याने सुरू आहेत. संकुचित राजकीय स्वार्थासाठी विविध समुदायांमधे भयंकर विद्वेष पसरविण्याचे आणि क्षुल्लक समाजिक मुद्यांवरून समाजात दुही निर्माण करून, भोळ्याभाबड्या जनतेला एकमेकांविरुद्ध लढवण्याचेही प्रयोग अहमहमिकेने सुरू आहेत. काही भागात जिहादी मानसिकतेने डोके वर काढल्यामुळे राज्यातील सामाजिक शांतता आणि सौहार्द धोक्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर विदर्भासह महाराष्ट्रातील सज्जन शक्तत्रने श्रेष्ठ महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र सौहार्दयुक्त महाराष्ट्राचा संकल्प सोडला असून, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी ‘सजग रहो’ अभियान हाती घेतले आहे.
अभियानाला जाहीर केला पाठींबा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्रेष्ठ महाराष्ट्र – विकसित महाराष्ट्र सौहार्दयुक्त महाराष्ट्र’चा ‘सजग रहो’ अभियानास आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे निवेदन जळगाव जिल्ह्यातील संत, महंत, धर्मगुरू, उद्योजक, डॉक्टर्स, सीए, निवृत्त सरकारी अधिकारी, साहित्यिक, बुद्धिवंत, समाजधुरीण, पर्यावरणवादी, शिक्षणप्रेमी, कृषीतज्ज्ञ, आणि सिव्हिल सोसायटी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या अभियानामार्फत सुरू झालेल्या उपक्रमांना आमचा सक्रिय पाठिंबा असून, जळगाव जिल्ह्यातील सुजाण जनतेने तन-मन-धनाने या अभियानात सहभागी व्हावे, अशी प्रार्थना या निवेदनात करण्यात आली आहे. या अभियानात या महाराष्ट्र समिती माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पद्मश्री नामदेव कांबळे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, माध्यमकर्मी उदय निरगुडकर, आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते क्षितिज गायकवाड अशी अनेक मंडळी सहभागी आहेत.
यांची होती उपस्थिती
‘शिवप्रेरणा जागर’ या महाराष्ट्र स्तरीय व्यापक जनचळवळी अंतर्गत ‘सजग रहों’ या अभियानासाठीच्या पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, माजी माहिती आयुक्त महाराष्ट्र विलास पाटील, आत्मा, कृषी विभाग जळगावसेवानिवृत प्रकल्प संचालक अनिल भोकरे, विभागीय वणाधिकारी जळगाव डी. आर. पाटील, वरिष्ठ अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. अपर्णा भट, उद्योजक प्रकाश चौबे उपस्थित होते. दरम्यान, या निवेदनाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.