---Advertisement---
उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपमहापौर चौधरी यांनी घेतली भेट; पत्राद्वारे केली मागणी
जळगाव महानगरपालिकेतील रिक्त पदांमुळे कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत उपमहापौर मनोज चौधरी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देऊन महापालिकेतील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.
चौधरी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महापालिकेत सध्या साडेआठशे जागा रिक्त असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांमुळे नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्यात अडचणी येत असून, निर्णयप्रक्रियेत विलंब होत आहे. जर ही पदे तातडीने भरली गेली नाहीत तर आगामी काळात महापालिकेचे कामकाज अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकार्यांची भरती तसेच प्रलंबित कर्मचारी भरतीचा बिंदू नामावली मंजूर करून तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
असे आहेत रिक्त पद
पद संख्या
वैद्यकीय आरोग्य अधिकारी – १
मुख्य अग्निशमन अधिकारी – १
लेखाधिकारी – १
उपमुख्य लेखापरीक्षक – १
शहर अभियंता – १
सहाय्यक मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी – १
सहाय्यक संचालक नगर रचना – १
जीवशास्त्रवेत्ता-पशु शल्य चिकित्सक – १
सहाय्यक आयुक्त – ७









