Maharashtra Budget Session 2024 : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

Maharashtra Budget Session 2024 : निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरु होणार आहे.  हा अर्थसंकल्प पाच दिवस चालणार आहे.या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राज्याचे पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आज सकाळी ११ वाजता विधान परिषद तर दुपारी १२ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल. सरकारकडून महत्त्वपूर्ण पूरक मागण्या मांडण्याची शक्यता आहे. तसेच कायदा सुव्यवस्था, अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात जप्ती, सरकारी यंत्रणांतील कथित भ्रष्टाचार, मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून विरोधी पक्ष अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडतील असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या आधी २०२३ मध्ये, एकनाथ शिंदे -भाजप सरकारने “पंचामृत” तत्त्वावर आधारित २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५,४७,४५०, कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.