मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु, आद्यपही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. याकडॆ संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतांना महायुती सरकारबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 20 कॅबिनेट मंत्री, शिंदे गटाचे 12 आणि अजित पवार गटाचे 10 मंत्री असू शकतात. महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यामध्ये भाजपकडून 20 कॅबिनेट मंत्री, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 12 मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून 10 मंत्री असू शकतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली, आणि ही बैठक सुमारे एक तास चालली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर भेटी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली. तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. राष्ट्रपती मुर्मू यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
राजनाथ सिंह यांची शुभेच्छा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, “तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देतील, असा मला विश्वास आहे.”
14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. या विस्तारात एकूण 43 मंत्री असू शकतात, यामध्ये मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्री व राज्य मंत्र्यांचा समावेश होईल. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आणि 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
गुरुवार, १२ रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वसार्वा शरद पवार यांचा ८५ वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रसामाध्यमांनी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारणा केली असता, त्यांनी १४ डिसेंबर मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे संकेत दिले आहेत.