इतिहास विरोधी पक्षनेत्यांचा !

सुरुवातीला मुंबई राज्य विधानसभा, त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा आणि मग आता महाराष्ट्र विधानसभेत १९३७ ते २०२४ या काळात एकूण ३६ विरोधी पक्षनेत्यांनी पद भूषविले आहे. मात्र, यावेळी ही परंपरा मोडीत निघण्याच्या उंबरठ्यावर दिसत आहे. विरोधी पक्षातील कुठल्याही पक्षाला १० टक्के जागा मिळविता आल्या नसल्याने ही नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद एक प्रतिष्ठेचे पद आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह माजी राज्यपाल प्रभा राव, राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले मनोहर जोशी, एस. एम. जोशी, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे अशा दिग्गजांनी हे पद भूषविले आहे.

आजवर एकाच महिलेची या पदावर नियुक्ती

समाजवादी कार्यकर्त्या, जनता पार्टीच्या मृणाल गोरे यांनी २३ डिसेंबर १९८८ ते १९ आक्टोबर १९८९ या १० महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले. त्या १९७२ मध्ये० पहिल्यांदा मुंबईच्या मलाड भागातून निवडणूक लढवून विधानसभेत पोहचल्या. त्यानंतरच्या काळात त्या लोकसभेतदेखील पोहचल्या. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात झालेल्या ३६ विरोधी पक्षनेत्यांमध्ये आजवर ३५ पुरुष आणि एकमेव मृणाल गोरे या महिला आहेत.

महायुतीच्या तिन्ही शिलेदारांनी भूषविले

हे पद सध्या महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील तीन शिलेदार भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार या तिघांनीही विरोधी पक्ष नेतेपद भूषविले आहे.

एकनाथ शिंदे

२०१४ मध्ये युती तुटली आणि भाजपा-शिवसेना वेगळी लाढली होती. त्यावेळी भाजपाने १२२ जागांवर विजय मिळवत एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ या २४ दिवसांच्या अल्प कालावधीसाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पद भूषविले होते. त्यानंतरच्या काळात
शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली होती

देवेंद्र फडणवीस

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युतीत निवडणूक लढून नंतर पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसराक ाँसोबत जाऊन सरकार स्थापन केल्याने १०५ जागांवर विजयी झालेल्या भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. तेव्हा विरोधी पक्षनेतेपदाची धूरा देवेंद्र फडणवीसांना सांभाळावी लागली होती. ते १ डिसेंबर २०१९ ते ३० जून २०२२ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर शिवसेनेत उठाव झाला आणि ठाकरेंचे सरकार पडल्यानंतर ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार २०२२ मधल्या शिवसेनेच्या उठावामुळे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले.