महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल; जळगावात किती टक्के पडणार पाऊस?

पुणे/जळगाव । हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाने सरासरीही गाठली नाहीय. यामुळे आता जुलै महिन्याच्या मान्सून पावसाकडे लक्ष लागले आहे. अशातच हवामान खात्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी या महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल. कुठे कुठे पाऊस पडणार? याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

जुलै महिन्यात ‘या’ भागात पडणार पाऊस
महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिराव खुळे यांनी दिली आहे. तसेच दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण माण खटाव माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक जाणवते असे खुळे म्हणाले.

जळगावसह या जिल्ह्यात 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडणार
जळगांव, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांसह लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.ऑगस्ट महिन्यात ‘ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी असे कुळे म्हणाले.