परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक

#image_title

मुंबई :  जानेवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत, अवघ्या सहा महिन्यांत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘मी महाराष्ट्राचे मनःपूर्वक अभिनंदन करतो…’ माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो, असे नमूद केले.

गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १ लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ, संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक फक्त ६ महिन्यांत आली आहे.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये ३३ हजार ६० कोटी एवढी गुंतवणूक झाली असली तरी, ते राज्य महाराष्ट्राच्या कोसोद्र आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून, तिथे २९ हजार ५९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. राजधानी दिल्ली चवथ्या स्थानावर असून, दिल्लीत २६,८०७ कोटींची परकीय गुंतवणूक झाली.

तामिळनाडू परकीय गुंतवणुकीत पाचव्या स्थानावर असून, तिथे १३,५५३ कोटी आणि त्याखालोखाल सहाव्या स्थानावर असलेल्या तेलंगणात १२,८६५ कोटी गुंतवणूक झाली आहे. सातव्या क्रमांकावर हरयाणा असून, येथे १०,९७४ कोटी रुपयांची, त्यानंतर राजस्थानमध्ये १,२४२ कोटींची आणि सर्वांत शेवटी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ९४८ कोटी रुपयांची गुंतवणूक आली.

वर्षनिहाय महाराष्ट्रातील गुंतवणूक

२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी
२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी
२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी
२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी
२०२४-२५ : १,१३,२३६ कोटी
(एप्रिल ते सप्टेंबर)