सावधान ! जळगावसह ‘या’ जिल्ह्यावर मुसळधारसह गारपिटीचे सावट

#image_title

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे.

२७-२८ डिसेंबरच्या हवामानाचा अंदाज 

२७ डिसेंबर: नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

२८ डिसेंबर: विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांत पहाटेपर्यंत वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस होईल.

२९ डिसेंबरनंतरची स्थिती: विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वगळता राज्यात स्थिर हवामान राहील.
३० डिसेंबरपासून थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना : काढणी केलेली पिके आणि साठवलेला धान्य सुकवण्यासाठी सुरक्षित जागेची व्यवस्था करा. जनावरांना गारपीट आणि पावसापासून संरक्षण द्या. वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून झाडे व विद्युतसंपत्ती सुरक्षित ठेवा. कृषी विभागाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.