जळगाव : मराठा विद्याप्रसारक संस्था प्रकरणातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल ने अटक केली. संजय भास्कर पाटील (वय-47, रा.दिक्षीत वाडी) असे अटक संशियताचे नाव आहे. रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
संस्थेच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू असताना मराठा विद्याप्रसारक संस्थेचा ताबा घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटात वाद होवून संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. 19 जून 2018 रोजी घडली होती. यावेळी हल्लेखोरांनी हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक व लाठ्या काठ्यांचा वापर करुन तक्रारदारासह साक्षीदारांना मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रादार सुनिल धोंडू भोईटे यांच्या तक्रारीवरुन सुमारे 27 ते 28 जणांविरुद्ध भादवी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन तपासधिकार्यांनी याप्रकरणाचा तपास पुर्ण करुन त्याचे चार्जशीट मार्च 2020 मध्ये न्यायालयात दाखल केले आहेत. यातील काही संशयितांना यापुर्वी अटक झाली असून ते आता जामीनावर आहेत. तर पियूष नरेंद्र पाटील, बाळू चव्हाण रा. कानळदा, भूषण पाटील, चंद्रकांत जिजाबराव पाटील हे फरार होते. न्यायालयाच्या आदेशानुसार फरार दोन संशयितांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसांपासून होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांची माहिती गोळा केली जात होती. यामध्ये पियूष पाटील व भूषण पाटील हे दोघांचे लोकेशन पुणे येथे येत होते. तर बाळू चव्हाण व चंद्रकांत पाटील यांच्या नावात तफावत असल्याने त्यांना ताब्यात घेतले नाही. दम्यान, अन्य संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जाधव, रवी नरवाडे, संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, राजेश मेेंढे, गोरख बागूल, अक्रम शेख, संतोष मायकल, विजय पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, मपोहेकॉ रत्ना मराठे, अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, ज्योती पाटील यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यासे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सलीम तडवी, गणेश पाटील, विकास पोहरकर, युनूस तडवी, समाधान पाटील यांनी ही कारवाई केली.