---Advertisement---

विवाहित प्रियकर : प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी लग्न जुळलं होतं; त्यानं थेट..

by team
---Advertisement---

पारोळा : विवाहित तरुणाने २२ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सेल्फी काढला. हाच सेल्फी काढलेला फोटो तरुणीला चांगलाच महागात पडला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तरुणीच्या साखरपुड्यात गोंधळ घातल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी विवाहित तरुणाविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रानुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. या तरुणीला एका विवाहित तरुणाने, मी माझ्या पत्नीला फारकत देत तुझ्यासोबत लग्न करेन, असे खोटे आश्वासन देत तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. याच दरम्यान त्याने तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सेल्फी देखील काढला.

दुसरीकडे, तरुणीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरविले. ९ डिसेंबर रोजी तरुणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु असताना, या ठिकाणी विवाहित तरुण आला. त्याने तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. तसेच तरुणीसोबत मंगळसूत्र घालतानाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करेल, तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली.

या प्रकरणी तरुणीने पारोळा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विवाहित तरुणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment