---Advertisement---

विवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या; सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

---Advertisement---

नाशिक : चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचाला त्रासून एका विवाहितेने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघा जणांवर महिलेच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनुसार वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर संतप्त नातेवाईकांनी मयत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणात केला. कल्याणी संतोष शिरसाठ (वय ३५) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

कल्याणी शिरसाठ यांनी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर माहेरची मंडळींनी आक्रमक पवित्रा घेतला. कल्याणीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या तिच्या पती, सासू , सासरे यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

---Advertisement---

कल्याणीला तिचा पती व सासरची मंडळी विविध कारणांसाठी शारिरीक व मानसिक त्रास देत होते. या सततच्या जाचाला कंटाळून कल्याणीने शनिवारी विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संविल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींकडून फिर्यादीत करण्यात आला आहे. कल्याणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.


दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या बहादुरी येथील सासरच्या घराच्या अंगणात अंत्यसंस्कार केला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. तर कल्याणीच्या अंत्यविधीस पती, सासरा व सासू हे उपस्थित नव्हते. अंगणात करण्यात आलेल्या अंत्यविधीच्या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---