Brahmotsav जळगाव : जळगाव शहरापासून काही अंतरावर स्थित पाळधी येथील श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आमदार अमोल जावळे यांनीही मंदिराची भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे स्थित श्री सच्चिदानंद सद्गुरू साई बाबा मंदिर, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून यंदा त्याचा २२ वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभात, आज मंगळवार, दि. २४ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रसिद्ध गायिका प.पू.सुश्री. अल्काश्रीजी यांच्या सुंदरकांड सादरीकरणाचे आयोजन केले आहे, ज्यात हनुमानाच्या भक्तीचे वर्णन आहे.
याशिवाय, बुधवार, दि. २५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून इंडियन आयडॉल फेम गायक नितीन कुमार यांच्या भजन संध्येसुद्धा आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमस्थळी भेट देताना मंत्री गिरीश महाजन यांनी साई मंगल कार्यालय, द्वारकामाई हॉल (साई भक्त निवास) यांची पाहणी केली आणि प्रसादाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, सुरज (लाला) झंवर, दीपक ठक्कर, शैलेश काबरा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.