---Advertisement---
जळगाव । शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारल्यानंतर लागलीच ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे.
जळगाव तालुक्यातील नंदगाव फेसर्डी पिलखेडा नांद्रा फाटा हा रस्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती, परंतु गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या कामात अडचणी आल्या, पण आचारसंहिता संपल्यानंतर त्यांनी याचे प्राथमिकतेने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
आचारसंहिता संपल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने सुरू झाले. खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.
---Advertisement---