बाहेरच्यांना प्रवेश का? निष्ठावंतांच्या नाराजीवर अखेर मंत्री महाजनांनी दिले स्पष्टीकरण

---Advertisement---

 

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षप्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. दरम्यान, अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर ठाम आणि थेट भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले मंत्री महाजन?

मंत्री महाजन म्हणाले की, ज्या ठिकाणी भाजपची डाळ शिजत नव्हती, जिथे आम्ही कधीच निवडून आलो नाही, तिथे जर प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेतले, तर त्यात गैर काय?

”ते निष्ठावंत म्हणतात, पण निवडून येत नाहीत. पक्षाची जागा निवडून आणायची आणि व्होट बँक वाढवायची असेल, तर वाहेरच्यांना संधी देण्यात वाईट काय? असा सवाल मंत्री महाजनांनी उपस्थित केला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती पक्की असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत अद्याप चर्चा न झाल्याने महायुतीचे अंतिम चित्र सध्या अनिच्छित आहे. काहीही झाले तरी भाजप ५० पेक्षा कमी जागा लढवणार नाही, अशी ठाम भूमिका महाजनांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

आज होणार शिक्कामोर्तब


तसेच तिकीट न मिळालेल्यांना ‘प्रमोशन’चे गाजर दाखवत, बंडखोरांसाठी ”आमच्याकडे औषध तयार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगिलते की, शिंदेसेनेला सुरुवातीला १५ जागांचा प्रस्ताव होता, अंतर त्यांची मागणी २५ जागांची आहे. सध्या चर्चा २० जागांवर येऊन थांबली असून, आज रविवारी शिक्कामोर्तब होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---