---Advertisement---

मातृत्वाला काळीमा! दिव्यांग मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन आईनेच संपवलं अन् मृतदेह…

by team
---Advertisement---

ठाणे : ठाणे शहरातील नौपाडा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे १७ वर्षीय दिव्यांग मुलीची तिच्याच आईने हत्या केल्याचा आरोप असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला आजी आणि एका अनोळखी महिलेची मदत घेतल्याचे समोर आले आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीच्या रात्री, स्नेहल पवार आणि सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन यशस्वी पवार हिला ठार मारले. यशस्वी पवार मृत मुलगी जन्मतःच शारीरिकदृष्ट्या अपंग होती. ती चालू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती आणि अंथरुणाला खिळलेली होती.

हेही वाच : आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…

यशश्वीला 15 फेब्रुवारीपासून प्रचंड शारीरिक यातना होऊ लागल्या होत्या. तिच्या या आजारपणाला कंटाळलेल्या आई आणि आजीने 19 फेब्रुवारीला रात्री तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या जास्त गोळ्यांचे सेवन केल्यामुळे यशस्वीचा मृत्यू झाला. यानंतर आई आणि आजीने एका गाडीने तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील परसणी गावात नेला. तिकडे या दोघींनी यशस्वी हिच्यावर अंत्यसंस्कार केले.

सुरुवातीला हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता. मात्र, मुलीच्या आत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रणभिसे आणि त्यांच्या पथकाने जगताप चाळ येथील घरी जाऊन मुलीच्या आजीची चौकशी केली. त्यावेळी तिने यशस्वीचा खून केल्याची कबुली दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तसेच यशस्वीची फरार आई स्नेहल पवार हिचा शोध घेतला जात आहे.







Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment