Mother throws newborn baby on street : आई आणि लेकरांचं नातं म्हणजे अतूट आणि अनमोल. आईचं प्रेम हे सीमोल्लंघन करणारे असते, जे अपार धैर्य, समजूतदारपणा, आणि त्यागाचं प्रतीक. आईच्या काळजी आणि प्रेमामुळेच लेकराचं जीवन समृद्ध आणि सुरक्षित असतं. आईचं प्रेम हे अनंत असतं, जे केवळ शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. मात्र, या आई-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालीय.
काय आहे घटना
नवजात बालकाला जन्म देऊन आईने रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतापजनक म्हणजे, या नवजात बालकाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना संपर्क केला.
त्यानंतर, पोलिसांनी या बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे. मात्र, आई-लेकराच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेममुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवजात बालकाच्या पालकांचा शोधदेखील पोलीस घेत आहेत. तसेच, हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का ? याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नवजात बालकाच्या पालकांचा शोधदेखील पोलीस घेत आहेत. तसेच, हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का ? याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.