---Advertisement---

Jalgaon Airport : खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत केली जळगाव विमानतळांसंदर्भात ‘ही’ मागणी

by team
---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्रातील सर्वांत वेगाने विकसित होणारे जळगावचे विमानतळ असून, सद्यः स्थितीत विमानतळाचे कार्य फक्त एकाच पाळीत सुरू आहे. ते दोन पाळ्यांमध्ये सुरू करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मदतीची गरज आहे. केंद्र सरकारकडून तातडीने तांत्रिक व आर्थिक साहाय्यता मिळावी, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये केली.

जळगाव विमानतळावरून सद्यःस्थितीत देशांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू असून भविष्यात अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्यांतील पर्यटक वाढीसाठी विमानतळाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विमानतळावर हवाई प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येतेः परंतु, तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विमानतळात एकाच पाळीत कार्य सुरू असते, तसेच तेथे इतर भौतिक सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र शासनाने तातडीने विमानतळाला तांत्रिक व आर्थिक साहाय्यता उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली.

याबाबत खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजारापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन तातडीने जळगाव येथील विम ानतळाला तांत्रिक व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी केली. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून, लवकरच यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्र्यांकडून देण्यात आले. खासदार वाघ यांच्या मागणीमुळे लवकरव विमानतळावर सुविधा उपलब्ध होतील आणि जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातीत हवाई वाहतुकीला बळ मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment