जळगाव : शहरातील पाणीपुरवठा महिनाभरात तीन ते चार वेळा विस्कळीत होत असल्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे जळगावकर पाणीबाणी’ला सामोरे जात आहेत. कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठ्यावर आता महापालिका प्रशासनाने जळगावकरांना सूचना करीत पाण्याची नासाडी केली तर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून नव्हे, तर फेब्रुवारीपासूनच तापमान सरासरी ३५ ते ४० अंशांदरम्यान होते. सद्य स्थितीत तापमानाचा पारा ४४ अंशांदरम्यान असून, यामुळे बाष्पीभवन प्रक्रियाही वेगाने होत आहे. वाढते तापमान पाहता शहरात उन्हाच्या तीव्रतेच्या झळांचा तडाखा बसत आहे. महिनाभरात प्रकल्पीय साठ्यात तब्बल साडेआठ टक्के घट झाली असून सरासरी ०८ टक्के घट दरदिवशी होत असल्याचा अंदाज आहे दुसरीकडे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात टंचाईने डोके वर काढले असून, जिल्ह्यात टँकर सुरू करण्यात आले आहेत.
शहराला वाचूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांवर असून एवढ्या तोकसंख्येसाठी रोज ८०-८५ एमएलडी पाणीसाठ्याची गरज भासते. वाचूर धरणात सुमारे ७५ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाच्या पाश्र्वभूमीवर शहरातीत पाणीपुरवठ्याची स्थिती विस्कळीत झाली आहे. वाघूर धरण प्रकल्पातील पंप हाउस आणि उमाळे जतशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक कारणास्तव वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
त्यामुळे शहरात पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेतर्फे पाणीपुरवठा बंद न करता, उशिराने आणि कमी दाबाने पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे गेल्या सहा ते सात दिवसांपासून पाणी कमी दाबाने मिळणे, पाणीपुरवठ्याचा वेळ बदलणे किंवा कमी वेळासाठी पाणी मिळणे यासंबंधी तक्रारी वाढल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने जळगावकरांसाठी काही महत्वाच्या सूचना जरी केल्या आहेत.
‘या’ सूचनांचे पालन करा
पाणीपुरवठ्याच्या वेळी जलवाहिनीला घंटे वीजपंप जोडू नयेः उल्लंघन केल्यास वीजपंप जप्त केला जाईल. घरातील टाक्या भरल्यानंतर नळ बंद करावेत. पाण्याचा अपव्यय टाळावा; रस्त्यावर पाणी शिंपडणे, वाहने धुणे किंवा टाकी भरल्यानंतर पाणी वाहू देणे टाळावे, ज्या नळांवर तोट्या नाहीत, तेथे तत्काळ तोठ्या बसवाव्यात; अन्यथा अशी नळसंयोजने नोटीस न बजावता बंद करण्यात येतील. पाणी भरून घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करावा फुकट वाया जाऊ देऊ नये.
सर्वांना समान दाबाने आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यासाठी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाता सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता योगेश बोरोले यांनी केले आहे.