---Advertisement---

पाचोऱ्यात भयंकर घडलं, वृद्ध महिलेला संपवलं अन् सोन्याचे दागिने ओरबाडून झाले पसार

---Advertisement---

जळगाव : वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनाबाई माहरु पाटील ( वय ८५ ) असे मयत महिलेचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे शुक्रवार (५ जून) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे मयत महिला जनाबाई माहरु पाटील ( वय ८५ ) या वास्तव्याला होत्या. तर शेजारी त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हा राहत होता. दरम्यान, शुक्रवार (५ जून) रोजी कृष्णराव हा पाचोरा येथे मित्राच्या मुलाच्या वाढदिवानिमित्त गेला होता. वृद्ध महिला घरी एकटी असल्याचे हेरत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या ओरबाडून नेत पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, डॉग स्क्वॉडने गावातच सुगावा काढल्याने, या महिलेचा मारेकरी हा गावातीलच असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment