नंदुरबार : महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये. तसेच मतदारांना निर्भयपणे मतदनं करता यावे याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने पोलीस विभाग , राज्य उत्पादन शुल्क विभाग व इतर शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्दशांचे काटकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच नुसार नंदुरबार एलसीबीच्या पथकाने कारवाई करत सोमवार, २८ रोजी तलवार निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत पथकाने २३ तालवारींसह चाकू, गुप्ती जप्त करण्यात आली आहे. यात सात जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त. एस. यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना प्रभावीपणे कारवाईचे सूचना दिल्या आहेत. याकरीत पथक स्थापन करण्यात आले आहेत. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या पथकाने जबरी चोरीतील गुन्ह्यातील दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. यात सर्फराज भिकन शाह (वय २८, रा. मण्यार मोहल्ला ह.मु. भोणे फाटा घरकुल, नंदुरबार) फारुक बशीर शाह (वय २८ रा. भोण फाटा घरकुल, नंदुरबार) यांचा समावेश आहे. या दोघांची अधिक चौकशी केली असता सर्फराज शाह हा बेकायदेशीररीत्या धारदार तलवारी व इतर शास्त्र बनविण्याचे काम करीत असल्याचे उघड झाले आहे. हे काम तो त्याच्या भोणे फाटा घरकुलाच्या घरामध्ये करत होता.
ही माहिती उघड होताच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या आदेशानुसार पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी सर्फराज शाह याच्या घरात छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातून ८ धारदार तलवारींसह तलवारी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच त्याच्या अन्य सहा साथिदारांकडून १५ तलवारींसह चाकू व गुप्ती जप्त करण्यात आली.