नंदुरबार : शिवारातील पायल नगर, भोणे रस्त्याजवळी शेतात बिबट्याने रात्री 11 ते 12 वाजेचा दरम्यान वासरी व बकरीचा फडश्या पाडला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नंदुरबार नगरपालिका हद्दी लगत असलेले भोणे रोडवर अरविंद श्रावण मराठे, भास्कर श्रावण मराठे, उदय भास्कर मराठे यांचा शेतात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरीचा फडश्या पाडला. तसेच शेतात दोन दिवस अगोदर एका बोकडवर ताव मारल्याची घटना उघड झाली आहे.
नंदुरबार नगरपालिका हद्दीतील गांधीनगर, पायल नगर, हरिभाऊ नगर, गौरव पॅलेस मागील शेतामध्ये रात्री हिंसकप्राण्याचा वावर दिसून येत आहे. हा प्रकार मागील 15 दिवसापासून सुरू आहे. या हिंस्त्र प्राण्याने शेतात या अगोदर एका बोकडवर ताव मारला आहे. नंदुरबार शहरहद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या वावर सुरू आहे. या भागात नागरिकांमध्ये, शेतकरी, शेतमजूर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंसक प्राण्यांकडे वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित शोध घेत शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावला पाहिजे अशी मागणी केली आहे.