जळगाव : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. 8 वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा 1 जून 2025 रोजी पुणे येथे घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही उमेदवार असू शकतात. या परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. या परिक्षेसाठी विद्यार्थी विद्यार्थीनी उमेदवार 01 जानेवारी, 2026 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
पात्रता:
उमेदवार 1 जानेवारी 2026 रोजी 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा.
उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 11 वर्ष 6 महिने (अत्यल्प वय) आणि 13 वर्ष (अधिक वय) यामधील असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2013 च्या आधी आणि 1 जुलै 2014 च्या नंतरचा नसावा.
अर्ज कसा करावा:
अर्ज पत्र प्राप्त करण्यासाठी उमेदवार राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड (पिन कोड 248003) कडून अर्ज मागवू शकतात.
ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील उपलब्ध आहे, ज्यासाठी वेबसाईट: www.rime.gov.in वर जाऊन आवश्यक शुल्क भरून अर्ज घेता येईल.
सर्वसाधारण वर्गासाठी रु. 600/- आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी रु. 555/- शुल्क लागेल.
डिमांड ड्राफ्ट पद्धत:
डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे अर्ज मागवण्यासाठी, अर्जासाठी आवश्यक शुल्क देऊन कमांडंट, RIMC फंड, ड्रॉवी शाखा, एचडीएफसी बँक, बल्लुपूर चौक, डेहराडून कडे DD पाठवावा.
DD सोबत जातीचे दाखले (असल्यास) जोडावे.
आवश्यक कागदपत्रे:
अर्ज पत्र दोन प्रतींमध्ये भरणे आवश्यक आहे.
जन्म दाखला, निवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले (अनुसूचित जाती/जमातीसाठी), शालेय बोनाफाईड सर्टिफिकेट, आधारकार्ड आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो अर्जासोबत जोडावे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख:
अर्ज व आवश्यक कागदपत्रे 31 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयाला पोहोचली पाहिजेत.
परीक्षेचा तपशील:
परीक्षेचे पेपर: इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान.
लेखी परीक्षा 1 जून 2025 रोजी होईल.
लेखी परीक्षेतून निवडलेले विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षा यथावकाश कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी फोन नंबर: 020-29709617, ईमेल: [email protected], आणि वेबसाईट: www.mscepune.in वर संपर्क साधा.
विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्णपणे भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून, अंतिम तारीख पूर्वी अर्ज सादर करावेत.