---Advertisement---
तळोदा : केलखाडी येथील चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीवर पुल नसल्याने ,नदीवर पडलेल्या झाडाच्या फांदीवरून जीव धोक्यात घालून नदीपार करुन शाळेत जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी अक्कलकुवा विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी यांनी केली आहे
केलखाडी नदीवर पूल नसल्याने येथील गावकऱ्यांना झाडाच्या साहाय्याने नदी पार करावी लागत आहे. नागेश पाडवी यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. येथे त्वरीत पुल बांधण्यात यावा. जेणेकरून केलखाडीसह,नयामाळ येथील चिमुकल्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. तसेच गुलाआबां ते केलखाडी नयामाळ दरम्यान रस्ता करण्यात यावा. यामुळे केलखाडी,नयामाळ येथील गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी व रूग्णांला रूग्णालयात नेण्यासाठी सोयीचे होईल. तरी गुलाआबा केलखाडी नयामाळ रस्ता व केलखाडी नदीवर पुल तयार करून चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सोयीचे करावे अशी मागणी नागेश पाडवी यांनी शासनाकडे केली आहे
---Advertisement---
यावेळी नाला सरपंच भुपेंन्द्र पाडवी,भाजपा मंडळ अध्यक्ष भुषण पाडवी, वैभव पाडवी, अविनाश पाडवी, रविकांत पाडवी, लक्ष्मण नाईक, दिलीप नाईक, अनिल वसावे, कांतीलाल वसावे, देविदास पाडवी, जगदिश नाईक, शिवदास वसावे, प्रशांत वसावे केलखाडी, गुलाआबा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.