NEET-JEE Exam: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; ‘सुपर 100’ अंतर्गत मोफत निवासी कोचिंग

---Advertisement---

 

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सुपर 100’ या उपक्रमांतर्गत NEET व JEE (Advance) परीक्षांसाठी पूर्णतः नि:शुल्क निवासी कोचिंग देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार असून पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


या उपक्रमांतर्गत एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये SC – 14, ST – 36 आणि इतर – 50 असा संवर्गनिहाय समावेश राहणार आहे. तसेच 2 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष जागाही राखीव ठेवण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर परीक्षा होईल, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरावर अंतिम निवड केली जाईल. ही परीक्षा इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून 100 गुणांची असेल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा राहील.


या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत आहे. प्राथमिक निवड चाचणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.


पात्रता अटी :

विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय/अनुदानित शाळेतून इयत्ता 10 वीला प्रविष्ट असावा
इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक
2026-27 मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक
पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपर्यंत असावे


अधिवास प्रमाणपत्र आवश्यक

निवड झाल्यास दोन वर्षे निवासी प्रशिक्षण अनिवार्य
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, पुस्तके, अभ्यास साहित्य आणि निवास व्यवस्था पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.
या संदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---