Maharashtra Assembly Session : महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवारपासून सुरू झाल्याने नवनिर्वाचित उमेदवारांनी आमदार म्हणून शपथ घेतली. विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली.
राज्यात नवीन सरकारच्या स्थापन झाल्यानंतर आज पहिल्या विशेष आधिवेशला शैवारपासून प्रारंभ झाला आहे. या विशेष अधिवेशनासाठी महायुतीच्या आमदारांमध्ये उत्सह पाहण्यास मिळत आहे. त्यांनी फेटे परिधान करुन विधानसभेत हजेरी लावली आहे. विधानसभेच्या अधिवेशनास प्रारंभ होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसेच या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी व नवनिर्वाचित उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेतली.
भाजपचे कालिदास कोंळबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची घोषणा ९ डिसेंबरला केली जाणार आहे. हंगामी अध्यक्ष कोंळबकर हे सर्व २८८ आमदारांना शपथ देणार आहेत. यावेळी विधानसभेत ७८ नवीन आमदार आहेत. आज होणाऱ्या शपथविधीत विरोधी पक्षाच्या आमदारांचा समावेश असणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शपथ घेतली नसून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.
विधानभवनात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली. ठाकरे यांनी यावेळी फडणवीस यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.
विरोधी बाकांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अगदी समोरच्या बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव बसले आहेत. तर सभागृहात कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या आमदारांची अनुपस्थिती दिसून आली. त्यातच शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील हे सभागृहात उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं.