चाळीसगाव : तालुक्यातील पातोंडा गावाजवळ २९ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुदैवी घटना घडली. समोरुन भरधाव येणार्या अज्ञात वाहनाच्या प्रकाश झोझात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. झालेल्या या अपघातात दुचाकीवरील नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले. प्रियंका रोकडे असे मयत नवविवाहितेचे नाव असून पती उमेश रोकडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा येथील गुरूमाऊली हार्डवेअरचे मालक उमेश रोकडे व त्याची पत्नी प्रियंका रोकडे हे दोघ. दि. २९ रोजी सकाळी ५ वाजता काही कामानिमित्त नाशिकला जाण्यासाठी, मोटार सायकलने चाळीसगाव रेल्वे स्टेशनला निघाले. पातोंडा गावा जवळून अवघ्या एक किलोमीटर अतंरावर चाळीसगव-भडगाव रोडवर समोरुन भरधाव येणार्या अज्ञात वाहनाच्या प्रकाश झोझात उमेश यांचेे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने, दुचाकी रस्त्याच्या खाली पडली.
यात प्रियंकाचा डोक्याला दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश यांनाही जबर मार लागल्याने ते बेशूध्द अवस्तेत होते. थोडी शुध्द आल्यावर त्याने घरी फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मयत आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, उमेश व प्रियंका यांच्या नुकताच विवाह झाला होता. लग्नाला पाच ते सहा महिने झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात नववधुचा मृत्यू झाल्यामुळे पातोंडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.