Assembly Election 2024 : रोहिणी खडसे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

मुक्ताईनगर : आज गुरुपुष्यामृतच्याच्या मुहूर्तावर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा समावेश आहे. त्यांनी शक्तिप्रदर्शन करत तहसील कार्यलयात आपला उमेवारी अर्ज वसूबारसच्या मुहूर्तावर गुरुवार, २४ रोजी दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्षातील आमदार , नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताबाईच्या मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताबाईची विधिवत पूजा केली आणि दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नागेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले.

जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळे मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. त्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात उमेवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, जनता माझ्याबरोबर असल्याने मी भरघोष मताधिक्याने निवडून येईल. जनता मला मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी देतील असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही सर्व सर्व निष्ठेने व प्रामाणिकपणे रोहिणी खडसे यांच्या मागे उभे आहोत. यापुढेही उभे राहू. आम्हाला विश्वास आहे की रोहिणी खडसे ह्या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैय्या पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रोहिणी खडसे ह्या प्रचंड मतांनी निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला आहे.

त्यांच्यासोबत रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैय्या पाटील हे उपस्थित होते.