---Advertisement---

जळगावात पोलिसांकडून वाहनचालकांना पुष्पगुछ, चालक भारावले

by team
---Advertisement---

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. विशेषतः देशभरात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. जळगाव शहरात देखील जिल्‍हा वाहतूक पोलिसांच्या वतीने जागतिक चालक दिनाचे औचित्‍य साधून वाहनचालकांचा पुष्पगुछ देऊन सत्‍कार करण्यात आला. आरटीओ ऑफिस येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आरटीओ यांनी चालकांना मार्गदर्शन केले.

यामध्ये राजू करे महेंद्र, अबोटी साहीदभाई, अरूण दलाल, प्रमोद असलभाई, विरेद्रभाई संतोषभाई, याक़ूब भाई, अलीमभाई यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक वाघ यांनी केले.

याप्रसंगी ट्रान्सपोर्ट अध्यक्ष पप्पूशेठ बग्वाल, सहायक मोटर वाहन निरीक्षक गोपाल पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक नीलम सैनानी, सहायक मोटर वाहन निरीक्षक रंजित टिके.चालक लक्ष्मण आगलावे, चालक किशोर मोघे आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment