Pachora Crime : गर्भपात करणाऱ्या डॉक्‍टरसह एकाला पोलीस कोठडी; मुख्य आरोपी अद्याप फरार

---Advertisement---

 

Pachora Crime : पाचोरा, प्रतिनिधी : मावस काकाने अत्याचार केल्यामुळे गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी अटक डॉक्‍टरसह एकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

पाचोराच्या एका गावातील विद्यार्थीनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दरम्यान, ती सातवीत असताना, तिचा मावस काका प्रवीण इंगळे (रा. कोणगाव, कल्याण जि. ठाणे) याने विनयभंग केला.

२०१९ आणि २०२५ मध्ये कोणगाव, कल्याण येथे तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला. यातून पीडित तरुणी ही गर्भवती राहिली. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी (आई, काका व आजी, बाबा) बदनामीच्या भीतीने पाचोऱ्यातील एका डॉक्टरांकडे जाऊन तिचा गर्भपात करून घेतला.

याबाबत पीडित तरुणीने पाचोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा मावस काका, आई, आजी, बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेचा काका मनोज प्रभाकर भालेराव (३५, रा. वेरुळी ता.पाचोरा) व या गुन्ह्यात आरोपी डॉ.रवींद्र पाटील (५०, रा.पाचोरा ) यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण इंगळे (रा.कोणगाव, कल्याण जिल्हा ठाणे) हा फरार असून त्याचा पाचोरा पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---