जळगाव : शहरातील एका महिलेची ४ लाख ८९ हजार ४०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नम्रता चंपालाल जैसवाल (वय ३५ रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांना टेलीग्राम व इंटरनेटच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने १४ एप्रिल ते २८ जून दरम्यान संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना काही टास्क पुर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळे कारण सांगून तब्बल ४ लाख ८९ हजार ४०० रुपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केली.
यानंतर त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शनिवार, २९ जून रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करीत आहे.