Operation Sindoor: पहलगाममधील बैसनार घटित २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले या अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि POK मधील एकूण ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता, यात १०० अधिक दहतवादी ठार झाले होते. भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून मंगळवार दिनांक २० रोजी ‘सिंदूर यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर देशभरातच नव्हे तर जगभरातही चर्चेचा विषय ठरले. या ऑपरेशना अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा नायनाट केला. तसेच संपूर्ण जगाला भारतीय सैन्याने आपली ताकद देखिल दाखवून दिली.
भारतीय सैन्याच्या या यशस्वी कामगिरीनिमीत्त देशभरात शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. जळगाव शहरातून देखिल याच माध्यमातून तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत ‘भारत माता कि जय, वंदे मातरम्, हम से जो टकरायेगा, मिट्टी में मिल जाएगा’ अशा घोषणांनी शहर अक्षरश: दणाणले होते. दरम्यान जळगाव शहरातून काढण्यात आलेल्या ‘तिरंगा यात्रे’च्या पार्शवभूमीवर शहरातून मंगळवार २०मे रोजी ‘सिंदूर यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.
असा असेल सिंदूर यात्रेचा मार्ग
सिंदूर यात्रेची सुरुवा मंगळवार २० रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता, ब्राह्मण महासभा,बळीराम पेठ येथून होईल ही यात्रा प्रकाश मेडिकल-सुभाष चौक-मार्गे झाशीची राणी स्मारक बेंडाळे चौक येथे यात्रेचा समारोप होईल.