जळगाव : गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधाऱ्यानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून गावाचा विकास हा लोकांच्या मनात ठसला पाहिजे. तसेच बचत गटाच्या महिला अधिकाधिक सक्षम व्हाव्यात, जिल्हाभर बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सुसज्ज अशा मॉलची निर्मिती करण्यात येत असून गावाचा विकास बॅनरवर नव्हे, तर जमिनीवर दिसला पाहिजे. त्यासाठी सरपंचासह सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेत सहकार्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा परिषदेव्दारे ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजने’च्या विशेष जनसुविधा अनुदानअंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण कार्यक्रम पार पडला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या लाभार्थी घरकुल धारकांना जागा वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोम वंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार ग्रामपंचायत उपमुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रा.पं., स्मशानभूमी बांधकाम, घरकुल लाभार्थी जागा वाटप आदेशाचे वितरण पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आदी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायत भवन बांधकाम, १३० स्मशानभूमीसह बांधकाम, पोहोच रस्ते आदी विविध विकास कामांच्या आदेशाचे सरपंच, ग्राम सेवकांना वितरण करण्यात आले.
तसेच राज्य शासनाच्या सरळसेवा भरतीतर्गत २१ पात्र कंत्राटी ग्रामसेवकांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या, पदाधिकारी उपस्थित होते.
Jalgaon News: बॅनरवर नव्हे, तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटील
by team
Updated On: मार्च 30, 2025 12:17 pm

---Advertisement---